Author Topic: गर्भाचा गोळा  (Read 514 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
गर्भाचा गोळा
« on: February 03, 2015, 08:21:43 PM »
कचरा कुंडीत
गर्भाचा गोळा
नाजूक कोवळा
मुंग्यांनी भरला

आदिम शिकारी
भुकेला आंधळा
धावून आला 
तुटून पडला
 
स्पर्शल्या वाचून
दुध ओठाला
सूर टॅहॅचा
हरवून गेला

नूतन मृदुल
कोरला पुतळा
आताच उमटे 
आताच फुटला

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: February 06, 2015, 11:17:56 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता