Author Topic: एक ओसाडलेले रान  (Read 609 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
एक ओसाडलेले रान
« on: February 09, 2015, 12:23:07 PM »
भुकेनी व्याकूळ जनावरे
हरवून बसली भान
दिसत नव्हते कुठेही
हिरवेगार पान
ज्वालामय सूर्याच्या लाटा
मांडून बसल्या ठाण
असे मी बघितले
एक ओसाडलेले रान ! !

डोंगराच्या पल्ल्याड
नदी पडली ओसाड
थेंब थेंब पीत होतं
सूर्यकिरण ते खादाड ! !

तहान भुकेच्या शोधात
होते सारे धुंद
तापली सारी जमीन
दगडेही झाली लालबुंद ! !

नाहीसी झाली हिरवी झाडे
उरले त्याचे सांगाडे
ढीपल्या लागल्या गळु
जळत होती नग्न खोडे ! !

गोड पक्षांचे सूर
झाले सारे नाहीसे
घेऊन पंख उरले सुरले
उडत होती कसेबसे ! !

आई फिरती पीले रडती
पाण्याविना साऱ्याची दशा
चारा पाणी शोधता शोधता
थकून बसले दाही दिशा ! !

जमीन तापली डोंगर तापला
तापले तेथील सारेजन
वर वर तापता तापता
तापले होते आतील मन ! !

म्रुत्यू त्यांच्या दारापाशी
घालीत होते थैमान
असे मी बघितले
एक ओसाडलेले रान ! !


संजय बनसोडे
« Last Edit: February 09, 2015, 12:52:01 PM by sanjay bansode »

Marathi Kavita : मराठी कविता