Author Topic: शाेध  (Read 573 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
शाेध
« on: February 14, 2015, 10:42:44 AM »
शोध

सुखाची तर
आस सा-यांना
सहारा माझा
सलत्या दु:खांना !

प्रेम मजवर
अतिव त्याचे
मिसळुन उरलेले
नाते दोघांचे !

ठायी तयाच्या
आर्त चिरंतनाचे
विचारतो, भय रे
कसले सुखाचे ?

क्षण आसक्तिला
शोध शाश्वताचा
निवृत्त लाटेवर
स्वभाव त्याचा !


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता