Author Topic: मी.. फक्त एक माणूस  (Read 618 times)

Offline MK ADMIN

  • Administrator
  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,514
  • Gender: Male
  • MK Admin
    • marathi kavita
मी.. फक्त एक माणूस
« on: March 09, 2015, 11:10:26 AM »

बाईपणाचे आज माझ्या - कौतुक तुम्ही करणे नको
कर्तृत्वाचे आज माझ्या - वजन तुम्ही तोलणे नको
भरारीची आज माझ्या - झेप तुम्ही मोजणे नको
आजपुरतेच मला तुमचे हे डोक्यावर घेऊन नाचणे नको
नको आहे उदो उदो माझ्या स्त्री- आत्मशक्तीचा
नको आहे आरक्षणाचा राखीव नियम तो सक्तीचा
बाईपण माझे - ते तुमचे मला जपणे नको
अबला सबला इत्यादी, चिकटलेली विशेषणे नको
उंच उत्तुंग भरारीला माझ्या बाईपणाची शिडी नको
अमर्याद कर्तृत्वाच्या पायी बाईपणाची बेडी नको
उमलू दे- फुलू दे.. नैसर्गिकच- संकरीत कलमी फुलणे नको
आज खुलताना मनभरुन- एरव्हीचे मन मारुन कुढणे नको
आज मखरात सजताना- रोजचे अडगळीत सडणे नको
आज मुक्त वावरताना- भररस्त्यात उद्या अडणे नको
महिला दिनी सलाम ठोकून वर्षभर उट्टे काढणे नको
आजच्या पुरते पाय धरुन - वर्षभर पाय ओढणे नको
पुरुषदिन केलात का साजरा कधी...?
मग महिलादिनाचीही महती नको..
"माणूस" म्हणूनच जगू द्या हो फक्त..
एकाच दिवसापुरती ही पोचपावती नको..
-मी फक्त एक माणूस.

-- Author Unknown

Marathi Kavita : मराठी कविता