Author Topic: भिंत  (Read 483 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
भिंत
« on: March 10, 2015, 08:45:30 AM »
भिंत. . .
---------------
पाडलेल्या भिंतीवरून
पक्षी ओरडत होता,
घर होत त्यावर त्याच
ओरडून तो सांगत होता.

कशावरून तरी काल
दंगल पेटली म्हणे,
मंदिर-मस्जित म्हणत
भिंत पाडली म्हणे.

दगड विटांची होती भिंत
जाती धर्माची नव्हती,
फक्त म्हणूनच त्यावर
घरटी होती पक्षांची.

प्राणी-पक्षांत कुठे असतात
जाती-पंथाच्या भिंती,
माणसामध्ये आम्ही उभारल्या
जाती पातीच्या भिंती.

हिंदू मुस्लीम म्हणत,
भिंती ऊभारून जातीपातीच्या
मंदीर मस्जिदी पाडल्या.
त्याच भिंतीखाली,
पक्ष्यांच्या घरट्यातील
पुढच्या पिढ्या गाडल्या...
------------------
कवी : प्रविण रघुनाथ काळे
मो. 8308793007
दि. 9 मार्च 2015

Marathi Kavita : मराठी कविता