Author Topic: आत्महत्या  (Read 566 times)

Offline N...J

  • Newbie
  • *
  • Posts: 2
आत्महत्या
« on: March 12, 2015, 08:32:27 PM »
आत्महत्या म्हणजे काय, कळणार केव्हा
जगण्याच्या उमेदीचा दिवा, विजणार केव्हा

पळपुटेपणाचा सिद्धांत, सांगत असत जग
पण जगामागे धावणारं आयुष्य, थांबणार केव्हा

नात्यांच्या बंधनात, पुरताच गेलो गुंतूण
सैल झाले धागे, आता तुटणार केव्हा

दूरच्या त्या टेकडीवर, प्रकाश दिसतोय अंधूकसा
दुबळा झालोय मीसुद्धा,आता चढणार केव्हा

गर्द झाले आकाश, निराशलेल्या मेघांनी
अश्रू होऊन पाऊस, बरसणार केव्हा

नशीबाचा खेळ सारा,  दैवाच्याच हाती
नशीब होऊन दैव, मजला भेटणार केव्हा

Marathi Kavita : मराठी कविता