Author Topic: हूंडा  (Read 574 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
हूंडा
« on: March 22, 2015, 12:05:21 PM »
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हुंडा
जावायाच्या हट्टापाई
हप्त्यावर काढली होंडा ! !

एक एक पाई कमवीत होतो
दाग दागिने जमवीत होतो
सन वार सारे त्यागित होतो
कारण
एका पोरीचा मी बाप होतो
काळजावानी जपली आजवर
वयात आली यंदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ! !

पोरगी आली ज्वानी म्होरं
मनास पडला माझ्या घोरं
टपुन बसले सारे टवाळखोरं
मनास त्यांच्या दडलाय चोरं
लपवू तरी त्यांच्यापासून
पोर माझी कितींदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ! !

पसंद पडला डॉक्टर नवरा
पैशाच्या होता थोडा हावरा
दहा लाख हूंडा द्या मजला
हसत मुखानी मज वदला
मान पाणी, दाग दागिने
खर्च तुमच्याकडे समंदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ! !

गरीबीत मी आलो जरी
पोर मात्र दिली चांगल्या घरी
या हूंड्यापाई आता आयुष्यभर
कर्ज फेडतो सावकारी
सुशिक्षित लोकांचा या
कसला हा धंदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ! !


संजय बनसोडे
9819444028
« Last Edit: March 22, 2015, 12:06:18 PM by sanjay bansode »

Marathi Kavita : मराठी कविता