Author Topic: घेतो ओठी लिहूनी ओळी  (Read 551 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
घेतो ओठी लिहूनी ओळी
« on: March 27, 2015, 07:15:14 PM »


सरतो काळ
हळूहळू अन
परतून मागे
क्षण येईना
 
तनमन सारे
व्यापून वेदना
जरी तळमळे
जन्म कळेना

झगमग दुनिया
दिसे भोवती
खरी की खोटी
मज आकळेना

मेणाच्या या
दोन हातांना
सुख धगीचे
अन पेलवेना

असो जगाचे
व्यर्थ सांगणे
शब्दात या 
नसे सांत्वना

घेतो ओठी
लिहूनी ओळी
कधीतरी बघ
भेटेन सुरांना

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: March 28, 2015, 01:28:03 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता