Author Topic: नशिबाची खेळी....  (Read 760 times)

नशिबाची खेळी....
« on: March 28, 2015, 06:34:10 PM »
अजुन कसं हसावं
खोटं तरी कसं जगावं

मनात काहुर दु:खांचा असे
देवासमोर उभे राहुन
आसवांनी मी ओवाळावं किती 

धडपड सारखीच सुखांना एकदा पाहण्याची
आजवर मिळेना कदाचीत भेट घडावी निजलेल्या देहापाशी

अशी नशिबाची खेळी ही
बारी असे कधी तुझी कधी माझी....
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.२८.०३.२०१५..

Marathi Kavita : मराठी कविता