Author Topic: थरथरणारे हात लिहिती,...  (Read 504 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,253
थरथरणारे हात लिहिती,...

थरथरणारे हात लिहिती,उपेक्षितांचे दु:ख
ओले
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||धृ||
माणसांच्या सुखालाही,माणसांचे कर्म
नडले
माणसांच्या जाती मध्ये,जाती आणि धर्म
वाढले
माणसाची जात मात्र,माणूसच विसरला आहे
माणसांचा शत्रु आज,माणूसच ठरला आहे
माणसांशी वागतानाही,जणू माणसं झालेत
खुळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||१||
वेग-वेगळ्या जातीचा,वेग-वेगळा झेंडा आहे
वेग-वेगळ्या धर्माचा,वेग-वेगळा अजेंडा
आहे
प्रत्येक जाती-धर्मानं,आपला झेंडा ठरवलाय
मानवतेचा अजेंडा मात्र, माणसांतुनच
हरवलाय
नासमज म्हणण्या इतकेही,दिसत नाहित भोळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||२||
गतानुगतिकांचे स्रोत,आता जणू संपलेत
व्यवस्थेतील माणसं,बिनबोभाट झोपलेत
दिव्याचा प्रकाश जणू,दिव्याखालीच पडलाय
अन् सामाजिक तिमीरात,दिवा सुध्दा दडलाय
पण माणसांनीच विणले आहे,हे विषादाचे
जाळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||३||
अमानवी कृत्य सुध्दा, मानवाकडून होऊ
लागलेत
अन् माणूसकी पासुन माणसं,दूर-दूर जाऊ
लागलेत
नात्यांच्या पावित्र्याचेही,आता नुसतेच
भास आहेत
माणसांच्या विश्वासावर,अविश्वासी
विश्वास आहेत
मना-मनात फोफावले आहेत,कपटीपणाचे मळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||४||
स्रीयांची सुरक्षितता इथे, अजुन असुरक्षित
आहे
स्री-पुरूषांतील भेद मात्र,इथे आरक्षित
आहे
अन्याय आणि अत्याचार, अजुनही टळले नाही
स्री-पुरूष समतेचे ब्रीद,त्यांना अजुन कळले
नाही
खोलवर समाजात रूतली आहेत, विषमतेची मुळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||५||
अनागोंदी या जगण्यामागे,विचारच संकूचित
आहेत
म्हणूनच तर आज वंचित,अजुनही वंचित आहेत
वेदनांचे काहूर इथले,अजुनही ना निर्गमले
आहे
ना उपेक्षितांचे दु:ख,जगण्यातुनही विरले
आहे
ना लागले आहेत अजुनही, अमानुषतेला टाळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||६||
क्षणो-क्षणाला अन पदो-पदावर
जणू उद्रेक होतोय रासवांचा
इथे माणसांचेही बाजार भरले
पण ना बाजार पाहिला आसवांचा
विकासाच्या आशेवरच,मंद झाली कित्तेक
पाऊले
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||७||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

( कविता आवडली तर जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये,...)
( कवितेचा ऑडीओ मिळविण्यासाठी Whatsapp नंबर :- 9730573783 )

Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

लाजवंती

  • Guest
Re: थरथरणारे हात लिहिती,...
« Reply #1 on: April 14, 2015, 08:10:47 AM »
ही कविता कवींनी ह्या वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे ह्यांच्याकडे अभिप्रायाकरता पाठवावी. कवितेचा ऑडीओ मिळविण्यासाठी Whatsapp नंबर 9730573783सुद्धा त्यांना पाठवावा.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):