Author Topic: जारवा  (Read 387 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
जारवा
« on: April 22, 2015, 04:06:34 PM »
*******जारवा******
#############

जळून गेली ज्चारी बाजरी
कांदयाच्या पातीही जळाल्या
चांगले सारे जळून गेले
अन् तग धरुन राहिला जाल्या!

पेरले विचार जे बापाने
जारवा त्यास फुटला नाही
आई शपथ सांगतो
एक विचार काही रुजला नाही !

पेरले नव्हते जे कधीच
तेच बघ टरारुन रुजले
लोकशाहीचे विचार सारे
लोकशाहीतच कुजून गेले !

सुकून गेली जनता जनार्दन
नेत्यांचे पीक तरारुन आले
गुंडगिरीच्या जोरावर ते 
लोकशाहीचा जारवा तोडून गेले !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता