Author Topic: प्रिय बाबा  (Read 873 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
प्रिय बाबा
« on: April 25, 2015, 06:26:57 PM »
* प्रिय बाबा *

नको बाबा मला आता खेळणी आणि  खाऊ
लवकर या घरी तुम्ही नका परत जाऊ

व्याकुळला जीव बाबा तुमची वाट पाहुन
मम्मी सुद्धा रडते बाबा सारखी राहुन राहुन

आजीचेही डोळे बाबा सारखेच पाणवते
आज्यालाही आठवण तुझी सारखीच सतावते

बाबा तुझ्या हातुन मला खायचाय रोज भाता
सुट्टीवर कधी येता का परत लवकर जाता

गम्मत करत होते बाबा खर समजु नका
सीमेवर लढता आमची काळजी करु नका.

(रविंद्र कांबळे,पुणे,9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता