Author Topic: कंप...भूकंप  (Read 525 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
कंप...भूकंप
« on: April 30, 2015, 07:32:15 AM »
  ~~~भूकंप~~~
कशामुळे आई तुझ्या हृदयाचा कंप झाला
पालक तु आई आमचा का "ने-पाळ" केला

मानवाचे आक्रमण निसर्गावर न पाहवले तुला
कि उबगली तु ही येथील स्री-अत्याचाराला

माणूसकीच्या दुष्काळाने कंठ तुझा कोरडला
की विश्वासाचे अवर्षण देखीले तु ही डोळा

आचारांतली भ्रष्टता ही पदोपदी तु पाहिली
कि मानव्याची लक्तरे ती तुला न साहवली

बघतो उघड्या डोळ्यांनी माझाही होतो कंप कधी
तुझेही थरथरने हृदयी आम्हा वाटे भूकंप कधी
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता