Author Topic: कोणी दुःख जाणा पोलिसाच  (Read 430 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
* कोणी दुःख जाणा पोलिसाच *

का करतोय आत्महत्या
सारखा सारखा पोलिस
सरकार जरा लक्ष्य दया
कोण धरतय त्यांना ओलिस

रक्षकाला ही सुरक्षे ची
आता गरज भासु लागली
जगन्या पेक्षा मरण्यात
का धन्य मानु लागली

रोजच होते त्यांची
चौदा पंधरा तास ड्यूटी
हक्काची सुद्धा मिळत नाही
वेळेवर त्यांना सुट्टी

मनोधैर्य वाढवा त्यांचे
सुट्या करा मंजुर
दोन्ही सभेत विषय घ्या
अन विचार करा गंभीर

उन्हा पावसात निष्ठांवंत
तरी त्यांना सदा ऐकावं लागते
सामान्य माणसाला जगताना
पोलिसामुळे सुरक्षित वाटते

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)