Author Topic: भ्रष्टाचार  (Read 456 times)

Offline Sachin Mali

  • Newbie
  • *
  • Posts: 10
भ्रष्टाचार
« on: May 20, 2015, 02:32:58 PM »
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार भ्रष्टाचार किती हा भ्रष्टाचार
अजून किती दिवस ओरडणार आहात म्हणत अत्याचार अत्याचार

प्रत्येक माणूस म्हणतो साहेब देता का काम लवकर करून
मग साहेबांचेही नियम बदलतात सगळे टेबला खालून

कुठल्याही ऑफिस मध्ये जा चिरी मिरी दिल्याशिवाय काम  होत नाही
अरे यांचे तर जगच वेगळे यांचा काही नेम नाही

अस्तित्वात नसलेले दस्तावेज तुम्हाला येथे सहज मिळतील
पण जिवंत माणसाला हे जिवंत पणीच मारतील 

आज येथे प्रत्येकाचा चेहरा भ्रष्टाचाराने माखला
समोर उभ्या जिवंत माणसाला मागितला जातो हयातीचा दाखला

सगळ्यात पहिले स्वतःच्या आत डोकावून पहा
जिवंतपणी मेल्यासारखे नको असे वागत रहा

या भ्रष्टाचाराला तुम्ही आम्ही सगळे आहोत जबाबदार
पहिले स्वतः पासून सुरवात करा तोवर नाही हा संपणार
तोवर नाही हा संपणार


सचिन माळी
Ph: 9764987912
Email: - sachin7mali@gmail.com
Read My Other Poems On :- ''http://malisachin.blogspot.in/"
« Last Edit: June 11, 2015, 02:30:32 PM by Sachin Mali »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline महेश रा. केसरकर

  • Newbie
  • *
  • Posts: 18
  • Gender: Male
Re: भ्रष्टाचार
« Reply #1 on: May 20, 2015, 08:43:45 PM »
True.. Mast.

Offline Sachin Mali

  • Newbie
  • *
  • Posts: 10
Re: भ्रष्टाचार
« Reply #2 on: May 21, 2015, 06:08:16 PM »
Thanks mahesh