Author Topic: मुलं  (Read 493 times)

Offline Sachin Mali

  • Newbie
  • *
  • Posts: 10
मुलं
« on: May 22, 2015, 05:45:45 PM »
मुलं

मुलं म्हणजे देवा घरची फुलं    
आहो आपण या म्हणीला कधीच कचरा कुंडीत नेलं

मुलगी झाली म्हणून आपण नेहमीच काढतो गळा
नशीबवान असते ती स्त्री जिला लागतो मातृत्वाचा टिळा

मुलांची किमत मुल नसलेल्या नवरा बायकोला विचारा
मुलगी घर सोडून जाते तेव्हा रडतो बाप बिचारा

मुलगा होता आई वडिलांना वाटे आपण आता सुखाने राहू
तोच मुलगा म्हातारपणी म्हणतो यांना वृद्धाश्रमात नेऊ

मुलगी म्हणते बाबा मला नकाना परक्या घरी पाठऊ
बाप म्हणतो कन्यादान करून स्वर्गात सुखाने जाऊ

आई वडील आयुष्य काढतात खूप खस्ता खात
मुलांचे एकच कर्तव्य आहे द्या त्यांची नेहमी साथ      

आई वडीलांन सोबत कसेही वागतांना लक्षात नाही ठेवलं
कि देवाने इथेच हिशोब चुकता करण्यासाठी मलाही दिली आहेत मुलं 
मलाही दिली आहेत मुलं


सचिन माळी
Ph: 9764987912
Email: - sachin7mali@gmail.com
Read My Other Poems On :- ''http://malisachin.blogspot.in/"
« Last Edit: June 11, 2015, 02:28:33 PM by Sachin Mali »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: मुलं
« Reply #1 on: May 26, 2015, 01:28:23 PM »
A1.......... great
khup chhan aahe :)