Author Topic: अरे देवा  (Read 383 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
अरे देवा
« on: May 23, 2015, 01:08:17 PM »
अरे देवा खरच तु असशील तर मला सांग,
पुरुष आणि बाईत इतका फरक का केलास.
सगळ सोसुनही तिच्या वाटेला दु:ख दिलेस ?
एरव्ही घर सांभाळताना त्याला घर माहिती नव्हतं,
अचानक हे हक्काच अन्याय करण्याच लाईसेन्स का दिलेस?
भावनिक बिचारी दिलदार ती,
जोडुन ठेवण्या संसार मरमरते ती.
पोटच्या लेकरांसाठीच सगळ झेलते ती.
त्याच्या ममतेला नसतो का पाझर,
आपल्या अंशालाही सतावुन
ऐश करणारा असा कसा तो नर?
प्रेम , आपुलकी , ममता कुठे ठेवली होती तु,
तुला काय विचारू तुझ्यासाठीच तर महिला होतं वासनेच फूल.
नंतरच काय
अगतिक या समाजाला झालय काय?
कमावती असुनही तिच अस्तित्व काय?
खरच शिकून माणुस बदललाय काय?किती झाल्या फुशारक्या .झाला अगतिक थाट
तरी नाही येत त्याला किव
उठता-बसता लाथ अन् तोंडाला नाही बंधन,
पुरुषी मानसिकतेतुन नाहीच होणार या स्ञीच रक्षण....!!!!

Marathi Kavita : मराठी कविता