Author Topic: असं किती दिवस चालायचं  (Read 635 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
काहीही भाषण ठोकायचं
सत्ताधारी विरुद्ध ओकायचं
जनतेला मोहात टाकायच
आपललं राज्य थाटायच
मंग जनतेलाच लूटायच
असं किती दिवस चालायच

विरोधी असता सक्त बनायच
सत्ताधाऱ्याला लक्ष करायच
त्यांना गाडून सत्तेवर यायच
मंग जनतेलाच भक्ष करायच
असं किती दिवस चालायच

सत्तेसाठी लोटांगन घालायच
सत्तेसाठी झोपड्यात राहायच
भिकाऱ्याचाही भाऊ व्हायचं
शेतकऱ्यांच्या पाया पडायच
मंग त्यांनाच मातीत गाडायचं
असं किती दिवस चालायच

मतदाताला गाजर दाखवायच
गोरगरीबां पुढं झुकायच
घराघरात बंद पॅकेट वाटायच
पाच वर्ष तेच वसूल करायच
असं किती दिवस चालायच


संजय बनसोडे
9819444028