Author Topic: रिसायकल बिन..  (Read 406 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
रिसायकल बिन..
« on: June 21, 2015, 09:12:59 PM »


डिलीट केलेला डेटा
बराचवेळ पडून असतो
रिसायकल बिन मध्ये
अगदी नक्की डिलीट
करायचे ठरवून ही ...

नात्यांचेही तसेच असते
रीस्टोर करायची गरज
संपलेली असूनही
आपण नाही करू शकत त्यांना
ऐम्टी कायमचे
जणू काही आपोआप
विरघळून जावेत ते
अशी मनिषा धरत
राहतो वाट पाहत...

हळू हळू बिन भरत जाते
ओझे वाढत राहते
तरीही आपण
अनसिलेक्ट करतो तो डेटा
आणि देतो बाकीचा उडवून
ओझे जे सांभाळणे नको असते
आणि टाकता ही न येते

जेव्हा कधीतरी क्रॅश होते सिस्टीम 
रिकव्हरीच्या पलीकडे होते डॅमेज
हवे त्याच्या बरोबर जाते
नको ते ही निघून
निरुपायी हवेपणात येते नाविन्य
पण एका नव्या रीसायक्लिंग बिन बरोबरच

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: रिसायकल बिन..
« Reply #1 on: June 24, 2015, 04:40:56 PM »
छान...... :)