Author Topic: धरणी माते तुझा वारस आत्महत्या करतो आहे  (Read 368 times)

Offline ravindra909

  • Newbie
  • *
  • Posts: 15


ना खेद आहे ना कसली खंत आहे
भारताच्या भूमिपुत्रांचा आक्रोश तरी काय आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे ।। धृ ।।
निसर्गाने माहित नाही का पाठ फिरवली
पाण्याविना तुला देखील अतृप्त ठेवली
अंकुर तुझ्या उदरात उगण्याची आता  आशाच संपली
माय माय करून माझ्या जीवनाची वेळ हि खुंटली
जगण्याची इच्छा आता राहिली का आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे ।। १ ।।
काय सांगू माझी व्यथा तुला
किंमत नाही ग मला आजला
जनावराला सुद्धा कायद्याचा पाठींबा आला
आमच्या आत्महत्येवरील कायदा बंद केला
मरणाच्या दारात आम्हाला का  जायचे आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे ।। २  ।।
निसर्गाने अशी थट्टा मांडली क्रूरतेची आमच्या
जमिनीतून काही उगवेल आता आशा नाही करायच्या
तूच असे पोरक केलास अशाच मेली ग जीवन   जगण्याच्या
कधी पाहतो लेकरांकडे माझ्या त्यांच्या सुकलेल्या चेहऱ्याच्या
जीव तळमळतो ग पण श्वास कुठे आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे ।। ३ ।।
काय सांगू तुला राजकारण्यांनी आमची थट्टा चालू केली
कत्तल खाण्यात सुद्धा इतके मारत नाहीत अशी आमची अवस्था केली
कालच मंत्री महोदय म्हणाले फक्त तीनच लोकांनी आत्महत्या केली
राज्यात ६०० च्यावर आमची लोक हो मेली
यांचा किती आमच्यासाठी चांगला विचार आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे ।। ४ ।।
मेल्यानंतर कसलीच चिंता नाही ग पाठी काय होते त्याची
परवड होत असेल नाही का माझ्या बायका पोरांची
कोण विचारत असेल ग त्यांना  तुम्हाला आस आहे का जगण्याची
जीवन असे संपवून काय मी चूक तर नाही केली मरण्याची
जगण्याची आस होती ग  मला पण  डोक्यावर कर्ज आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे ।। ५ ।।
लाखोंचा पोशिंदा अशी ओळख माझी जग बघ करते
बळीराजा म्हणून आज हि मला लोक लांबून पाहते
मदतीची अशा सोडा साधी चौकशी  कोण करते
मेल्यावर  माझ्या पाठी माझ्या मेल्याचे राजकारण होते
उभ राहण्याची सोय तरी आत कुठे आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे ।। ६ ।।
जिवंत असतो तर जगण्याचे मर्म कळाले असते
पिक नाही म्हणून घरात खाण्यासाठी काही नसते
सावकाराकडे कर्जाचे व्याज पण वाढते
म्हणून नाईलाजाने आत्महत्या करण्यास मन धजते
जगण्याची इच्छा आम्हालाही आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे ।। ७ ।।
पोरांच्या त्या अवस्थेकडे पाहून मन गलबलून जाते
जनावरांना चारा नाही पाहून खूप दुःख हि होते
मायेने लेकराप्रमाणे वाढलेली जनावरे खाटिकाकडे न्यावी लागते
तेव्हा त्यांच्या डोळ्यातील असावे पाहून काळीज आमचे  फाटते
म्हणून मरण आमच्या दारात बघा उभे आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे ।। ८ ।।
वर्षानुवर्षे जीवघेणा संघर्ष करावा लागतो
मातीतून काही उगवले नाही तर केविलवाणी पणे पाहतो
आज ना उद्या येईल चांगले पिक याच आशेवर राहतो
सरकार निवडून आम्ही देतो
तेच आम्हा लोकांची थट्टा मांडतो
कुठे नेवून ठेवला भारत माझा हे मी सांगतो आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे ।। ९ ।।
शेवटी धरणी माते तूच बघ तुझ्या लेकराची करून कहाणी
नाही येत ग इथल्या लोकांच्या डोळ्यात पाणी
आमच्या मरणाच्या गप्पा मारतात हे राजकारणी
शहरात राहणारे म्हणतात आत्महत्या करायला सांगितले कोणी
कसे सांगू शहरात कुठे शेती होत आहे
हे धरणी माते ज्याला तू आपला पुत्र मानते
त्याची आज अवस्था तरी  काय आहे   ।। १०।।

रविंद्र  सावंत