Author Topic: हातभट्टी नाँट आऊट-१०२  (Read 354 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
हातभट्टी नाँट आऊट-१०२
« on: June 25, 2015, 12:36:38 AM »
हातभट्टी नाँट आऊट-१०२

नाँट आऊटचा खेळ न्यारा
हात भट्टीचा बाजार सारा !!

नाँनस्टाँप मिळे हप्ता जेथे
कुणीही करावा धंदा येथे
यंत्रणेचा त्या हातभार प्यारा
नाँट आऊटचा खेळ न्यारा...

खाली वरती पैसा फिरतो
पैशा भोवती खेळ चाले
खाबुगीरीचा हाटच सारा
नाँट आऊटचा खेळ न्यारा...

पिणा-यां, ना चिंता घरची
दारूपुढे ना भान कुणाचे
ना तयांना पोलीस दरारा
नाँट आऊटचा खेळ न्यारा...

पिनारे तर पीवुन विसरती
ओढलेली ती क्षणिक दुःखे
भार उरे तो कुटुंबास सारा
नाँट आऊटचा खेळ न्यारा...

विकेट आपली गेले टाकून
थोडी थोडी हातभट्टी झोकून
येई शासनास ते ज्ञान उशिरा
नाँट आऊटचा खेळ न्यारा...

म्हणे प्रशासन "देवू त्या कुटुंबा
लाखरूपये न् नोकरीत जागा"
नको बोजा करदात्यांवर सारा
नाँट आऊटचा खेळ न्यारा...

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता