Author Topic: शेतकऱ्यांचे हाल  (Read 381 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
शेतकऱ्यांचे हाल
« on: July 01, 2015, 08:05:34 PM »
त्रस्त झाली मती
व्याकूळ माझी शेती
येई पाऊस  कधी अती
कधी पाण्याविना माती

पेरणी आनंदात झाली
पीक कोवळे डोले
केला घात पावसाने
बघता पानावती डोळे

तपे सूर्य नारायण
ढग गायब झाला
टाके पीक खाली मान
सारा सत्यानाश झाला

नको पुन्हा रं पेरणी
सारा कर्जात डूबलो
तीन वर्ष मी शेतात
बिना पैशाचा राबलो


संजय बनसोडे
9819444028

Marathi Kavita : मराठी कविता