Author Topic: पोवाडा  (Read 360 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
पोवाडा
« on: July 02, 2015, 11:13:16 AM »
*****पोवाडा*****
कवी - संजय बनसोडे


पाच वर्षाचं वारं ! बदले सरकार ! तोची भ्रष्टाचारं !
बघून जनता झाली बेजार - 2
मांडला चोरांचा बाजार -  जी जीजी !1!

ताई बाई अक्कां ! असो कुणी सखा ! बोल त्याचा पक्का !
नाही तुम्हां फसवणार - 2
येऊद्या एकदा आमचं सरकार - जी  जीजी !2!

येता सरकार ! विसरती सारं ! करती बेजारं !
आम्हां कोण अडवणार - 2
एक एक बंगला उभा करणार - जी जीजी  ! 3!

जनतेचे हालं ! शेतकरी बेहालं ! हेच खुशालं !
विदेशी सारे फिरणार - 2
गोरगरीब भुकेने मरणार - जी जीजी !4!

ना रोजगार ! महँगाई फार ! दुष्काळी आजारं !
दरवर्षी हेच दिसणार - 2
सरकार झोपा फक्त काढणार - जी जीजी !5!

हरएक पक्ष ! त्याच्यातच दक्ष ! पैशावर लक्ष !
नवनवीन युक्त्या लढवणार - 2
त्यातून पैसे उभे करणार - जी जीजी ! 6!

बदलला देश ! बदलला वेष ! झाला विदेश !
येथे स्वार्थी आणी लाचार - 2
ना राहिले आचार अन् विचार - जी जीजी !

संजय बनसोडे - 9819444028
( सदर पोवाडा हा संजय बनसोडे या नावाने रजिस्टर केलेला आहे. यात कुणी बदल करू नये )

Marathi Kavita : मराठी कविता