Author Topic: पूर्वजांचे वंशज  (Read 382 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
पूर्वजांचे वंशज
« on: July 09, 2015, 09:45:22 PM »
***पूर्वजांचे वंशज***
*****************
      अनिल सा. राऊत(9890884228)
*****************************

राजे महाराजे गेले
सरदार वतनदारही गेले
...
त्यांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा
गाडल्या गेल्या -
चिरेबंदी वाड्यांच्या
आखीव रेखीव अन्
तितक्याच मजबूत भिंतीत...

पुन्हा आल्याच नाहीत
त्या बाहेर...
अन्
नवीन घडल्याच
नाहीत शौर्यगाथा...
तरीही,
त्याच त्याच शौर्यगाथा
चिणल्या जातात
पुन्हा...पुन्हा
नव्या वाड्यांच्या भिंतीत..

अन्
मारल्या जातात बढाया,
दुबळ्या वंशजांकडून-
लाकडाच्या भुशाला
चंदनाचा लेप देवून
जाळल्या जातात जशा
बैठकीत अगरबत्त्या-
अगदी तशाच...!

*अनिल सा. राऊत*
9890884228

visit me:-http://shabdakalyanchagandh.blogspot.com/

Marathi Kavita : मराठी कविता