संमोहित करत सुटतो,
देत जातो भूल पावसाची,
तरी तुझे उगमस्थान नाही
सापडले आणखी;
धीरगंभीर,कधी तरल
उन्मत्त तर कधी अवखळ;
पण,दिसला नाही मजला
स्वभाव तुझा मायेचा...
ओतपोत प्रेमाने भरलेला;
पहा येताना आणता आलं तर
ओलावा जरासा,मृदगंधही
किंचीत किमान उसना...
यावेळी मी पाहिला आहे
हटवाद तुझा;
म्हणूनच...
यंदा पालखी तुकोबाची
अशीच निघून गेली आहे,
बिनपावसाची...
"नाटाळाचे माथी हाणु काठी"
म्हणणारा... तुकोबा;
तू ही कसा काय रे इतका
आता शांत शांत आहेस;
@ आदित्य अ. जाधव,(नागूरकर)
०९४०४४००००४,
दि,१५-०७-२०१५;पुणे;
वेळ-०९:१४ मि,रात्री;