Author Topic: बा निज गडे....  (Read 433 times)

Offline kartik mishra

  • Newbie
  • *
  • Posts: 1
बा निज गडे....
« on: July 16, 2015, 02:39:52 AM »


बां नीज गडे नीज गडे लडिवाळा, नीज नीज माझ्या बाळा
रवी गेला रे सोडूनी आकाशाला, धन जसे दुर्भाग्याला
अंधार वसे चोही कडे गगनात, गरिबांच्या जेवी मनात
बघा थकुनी कसा निजला हा इहलोक, मम आशा जेवी अनेक
खडबड हे उंदीर करती काना शोधायते फिरती, परी अंती निराश होती
लवकरी हे जातील सोडून सदनाला, गणगोत जसे आपणाला
नीज नीज माझ्या बाळा
बहु दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती,कुजुनी त्या भोके पडती
त्या मधुनी त्या दाखविती जगातला,दारिद्र्य अपुले बाळा
हे कळकीचे जीर्ण मोडके दार, कर कर कर वाजे फार
हे दुख्काने कढून कथी लोकाला, दारिद्र्य अपुले बाळा
वाहतो फटीतुनी वारा सुकावितो अश्रुधारा, तुज नीज म्हणे सुकुमारा
हा सूर धरी माझ्या या गीताला,नीज नीज माझ्या बाळा

जो वरी हे जीर्ण झोपडे अपुले, दैवाने नाही पडले
तोवरी तू झोप घेत जा बाळा,काळजी पुढे दैवाला
जोवरती ह्या कुडीत राहील प्राण, तो वारी तुज संगोपीन
तद नंतरची करू नको तू चिंता, नारायण तुजला त्राता
दारिद्या चोरीला कोण, आकाशा पाडील कोण
दिग्वासना फाडील कोण, त्रिलोक्य पती आता त्राता तुजला
नीज
तुज जन्म दिला सार्थक नाही केले,तुज काही न मी ठेवियले
तुज कोणी नसे छाया तुज आकाश,धन दारिद्र्य ची रास
ह्या दही दिशा वस्त्र तुला सुकुमारा, गृह निर्जन राहिला थारा
तुज ज्ञान नसे अज्ञानावीण काही, भिक्षेवीण धंदा नाही
तरी सोडू नको सत्याला, धन अक्षय तेच जीवाला
भावे भज दिनदयाळा, मग रक्षील तो करूणासागर तुजला

कवी : दत्तात्रय धोंडो घाटे

Marathi Kavita : मराठी कविता