ना थंडी ना पाऊस, ना पड़ते सधी मळभट
कळतेय का कुणाला, स्तब्ध निसर्गाची घुसमट ॥ धृ ॥
जगतो आपण ज्या उपकारत, सूरा खुपसला त्या काळजात
निसर्गाला लावुनी करवत, चललोय विकास मीरवत
हिरवळ ही चालली हरवत, पोखरतोय सारे पर्वत
कळतेय का कुणाला, स्तब्ध निसर्गाची घुसमट ॥ १ ॥
प्राणवायु गुदमरला विषारी धुरात, गांव बदलली शहरात
प्लास्टिक शिरले घराघरात, गल्ली बोळात अन बाजारात
कोंडल्या त्या नदया अविरत, मातीवर ओतले सीमेंटचे चिलखत
कळतेय का कुणाला, स्तब्ध निसर्गाची घुसमट ॥ २ ॥
वाद घातला आम्ही निष्णात, का बदल केला निसर्गात
अचंबित केले आम्हास, साध्या सोप्या एका प्रश्नात
जी केलिये क्रूर करामत, ती पेलायची आहे का हिम्मत
कळाली असेलच आता तरी, स्तब्ध निसर्गाची घुसमट ॥ ३ ॥
- आशीष अवसरे©
ashishavsare@gmail.com
Reg No: MEM/SS 3170