Author Topic: तुमचा शेतकरी  (Read 502 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
तुमचा शेतकरी
« on: July 17, 2015, 09:38:24 AM »
बारा महीने कष्टकरी
पोटासाठी रातदिस झुरी
घामाच्या खाणारा भाकरी
ऐका भाऊ सरकारी
मी हाय . . . . . . . . तुमचा शेतकरी !!


घरात नाही दाणा मागू कुणा भीक
दरवर्षी वाळतय शेतातलं पीक
राब राब राबतो शेतात
एक रुपयाही पडत नाही हातात
माझ्यापेक्षा श्रीमंत स्टेशनवरचा भिकारी
ऐका भाऊ सरकारी
मी हाय . . . . . . . तुमचा शेतकरी !!


Tv वर बघतो रोज तुम्ही एकही देश नाही सोडला
गावात कधी येऊन बगा शेतकऱ्याचा कणा मोडला
लय घुटमळतो जीव त्याचा त्यानं कधीच हंबरडा फोडला
आतातरी आमच्यासाठी योजना राबवा एक तरी
ऐका भाऊ सरकारी
मी हाय . . . . . . तुमचा शेतकरी !!


विदेशातले कधीतरी, शेतीचे तंत्रज्ञान बघा
येऊन मायदेशी परत ते आम्हांला ही शिकवा
दरवर्षीच्या दुष्काळावर मात करून
जगावे कसे द्या आइडिया
मंगच म्हणा येऊन इथं मेक इन इंडिया
बघा दरवर्षीचा आकडा शेतकरी किती चालले फासावरी
ऐका भाऊ सरकारी
मी हाय . . . . . . . तुमचा शेतकरी !!


संजय बनसोडे - 9819444028

Marathi Kavita : मराठी कविता