Author Topic: फाशी...?  (Read 615 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
फाशी...?
« on: July 25, 2015, 11:10:32 AM »
फाशी...?

चर्चेचा विषय तो अखंड
फाशीचा धर्म कोणता?
दंगलीतला बळी विचारतो
माझ्या रक्ताचा रंग कोणता?

पडतोय विसर अपराध्यांचा
राजकीय खेळ व्हायला नको,
न्याय मागतो वारस बळीचा
न्यायालयाचा अपमान नको।

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता