Author Topic: मृत्यू  (Read 1339 times)

Offline somesh zade

 • Newbie
 • *
 • Posts: 2
मृत्यू
« on: July 26, 2015, 03:43:07 PM »
सजवत होते मला
मी शांत निजलो होतो
बहुतेक आसवांच्या धारेनं
मी चिंब भिजलो होतो
.
शेवटची आंघोळ ती
होती गरम पाण्याची
ज्याला त्याला घाई
मला डोळेभरून पाहण्याची
.
ज्यांच्या खांद्यावर माझं
गेलं बालपण
त्यांनीच पुन्हा उचलून
घेतलं आज पण
.
जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं
.
आज वेगळंच
काहीतरी घडत होतं
वै-याचं ही प्रेम
माझ्यावर पडत होतं
.
'तिथवर' नेऊन सुद्धा
माझ्यावर प्रेम लुटवत होते
जोरजोरात रडून
सगळे मला उठवत होते
.
अजून चार लाकडं द्या
म्हणजे तेवढ्यात भागेल
माझ्याच कुणीतरी विचारलं
'अजून किती वेळ लागेल '
.
सरणावर झोपूनही
मी मौन पाळलं होतं
जिव लावणा-या माझ्यांनीच
मला जाळंल होत .
Somesh zade :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मृत्यू
« Reply #1 on: July 30, 2015, 04:37:42 PM »
छान आहे कविता .... :)

जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं....   ह्याचा अर्थ उमगला नाही ?

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: मृत्यू
« Reply #2 on: July 31, 2015, 01:30:31 PM »
milind ji..... yacha arth asa ki

javlche hi hote aani koni parke lok suddha hote.....
antyasanskar karayla tyala neu nka kiva tyla majhya dolyan aad neu nka..... majhya pasun dur nka neu as konitari mothyan ordun radat hot..........


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मृत्यू
« Reply #3 on: July 31, 2015, 04:44:54 PM »
शितलजी,
बरोबर आहे ...असाच अर्थ असावा ....

पण कवितेतल्या ओळी क्रमाने वाचल्या तर कुणीतरी परकी व्यक्ती 'न्हेऊ नका' असं मोठ्यानं सांगत होती असाच अर्थ जुळतो .....आता कुणी परकी व्यक्ती असं का सांगेल? कुणीतरी जवळचा सखा सोबती असेल तरच  जीवाचा आटापिटा करीत ओरडू शकतो !!!!

असो ....कविता आवडली ..... :)

होते सारे परके
होतं कुणीतरी जवळचं
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं....  कदाचित असं असाव ....
« Last Edit: July 31, 2015, 04:51:51 PM by मिलिंद कुंभारे »

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: मृत्यू
« Reply #4 on: July 31, 2015, 10:19:32 PM »
wa as hi chhan jultay...........
shabbad sha arth ghetla tr agodarchi line chuktey
tumhi aata ji kelit ti yogy.....

kavita tr aprtim aahe yat kahi vadach nahi.......

LEELA WAGHMARE

 • Guest
Re: मृत्यू
« Reply #5 on: August 04, 2015, 03:45:35 PM »
  kavita avadli.touching ani vasta ahe. Paraka mhanje kavichya manat asaleli pan jeevanat na bhetleli vyakti asavi. aaplya sarna pudhachya kavitanna shubhechha. ;)

Offline somesh zade

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: मृत्यू
« Reply #6 on: August 28, 2015, 03:59:18 PM »
thank you all.... :)