Author Topic: == चांग भलं ==  (Read 2234 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
== चांग भलं ==
« on: July 27, 2015, 01:22:32 PM »
त्राही त्राही सगळीकडे
साऱ्यांची नजर ढगाकडे
ढग अपुरे मोकळा आकाश
निवद लावले त्या देवापुढे

देवही ना एके हाक जीवाची
येईल का हो पाडी मरणाची
लिहिलं तरी काय या कपाळी
मुलं बाळं झोपलीतना उपाशी

मर मर करून केली हि पेरणी
कर्जापाई आली फास गळ्याशी
आशेची किरण मज दाव देवा
यंदा तरी गरिबाला तू पाव देवा

नकोच होऊ देऊ कुणाची दैना
देव म्हणून जरा देवपण दावना
कर मेहरबानी होऊदे काही भलं
विठ्ठलाच्या नावानं चांग भलं

विठ्ठलाच्या नावानं चांग भलं

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता