Author Topic: तुझ्यासाठी रे माणसा माझे देऊळ बंद  (Read 1057 times)

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
आला पुन्हा गाभाऱ्यात भिक मागाया ,
हात जोडून मोकळा तू पाप कराया
देऊन आमिष फुलाचे तू विकतो गंध
तुझ्यासाठी रे माणसा माझे देऊळ बंद ….

शिकला जरी तू ,तुझ्यामते मी का नाही ?
शक्ती जर मी तर तू मला देवळी का पाही
आहे तुझी  ज्ञानाची गाठ ,पण  श्रद्धेचे उसवले बंध
तुझ्यासाठी रे माणसा माझे देऊळ बंद ….

जाणतो का येते झाडाला मुळानंतर  खोड ?
विज्ञानाला असतेच नेहमी अध्यात्माची जोड
आता होऊ दे मनाचे तुझ्या बुद्धिशी द्वंद्व
तोपर्यंत तुझ्यासाठी रे माणसा माझे देऊळ बंद ….

                                                         …. मंदार बापट

Marathi Kavita : मराठी कविता


suresh Parimal

 • Guest
Surekh Mandar  :)

Offline Mandar Bapat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 263
 • Gender: Male
Dhanyawad Suresh...

Satish D

 • Guest
Satya paristhiti. Chan mandli.

Offline Ravi Padekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 146
 • Gender: Male
 • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...

apratim...!!!