Author Topic: पण खरचं स्वातंत्र्य मिळालं का आम्हाला..?  (Read 485 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 171
स्वातंत्र्य मिळवून झालीत 69 वर्ष...
पण खरचं स्वातंत्र्य मिळालं का आम्हाला?

अजुन अस्वच्छतेची गुलामी गाजवतेयच ना आमच्यावर मक्तेदारी
शौचालयाचे स्वातंत्र्य कुठे उपभोगतेय आमची मायमाऊली

कचरा,प्लॅस्टिक,सांडपाण्याची दुर्गंधी सतावतेय आम्हाला पावलोपावली
अजूनही झोपड़पट्टी वासियांच्या समस्या मनाला सुन्न नित करी

आमची मुलगी रस्त्याने जाताना आजही का भयभीत मनी
आयुष्य सारे का निघून जावे लढता लढता इथे न्यायासाठी

धर्मा-धर्मा ची नाती का झालीत इतकी सैलसी
मानवतेची का वाटावी आज पदोपदी आम्हां टंचाई

भ्रष्टाचाराची का चालावी रोज इथे दादागिरी
अन प्रामाणिकपनाची का व्हावी गळचेपी

आतंकीपणा का उठावा जीवावर अगदी
देशात राहूनही कुणा मुखी का गद्दारवाणी

आम्ही काहीच मिळवलं नाही असं ना म्हणनार कुणी
पण वाटतं खुप बाकी राहीलं करायचं अजूनही
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com