Author Topic: कसे रंग लेतात शब्द  (Read 593 times)

Offline prshu sondge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
कसे रंग लेतात शब्द
« on: August 23, 2015, 07:29:00 PM »
 कसे शब्द लेतात रंग

रंग सांगू जाता मनाचा
उनाडतो थवा शब्दांचा
कोणत्या रंगात नाऊ ?
प्रश्न होतो जीवनाचा .

वेदनेचे गीत माझे सखे
काळजाचा वीणा रे
शब्द होतो सूर बासरीचा
चांदण्याचा स्त्रवे पान्हा रे

कसे शब्द लेतात रंग
उदासीच्या कोण्या अत्तरात
कसे गंध होतात लापता
ह्रदयाच्या आत  कोंदणात

Marathi Kavita : मराठी कविता