Author Topic: पावसाळ्यामधी कसं पडलं कडक उन्ह  (Read 570 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
पावसाळ्यामधी कसं
पडलं कडक उन्ह
करपून गेली कशी
पिकासोबत रे मनं

दरवर्षी पेरतो
शेतामधी नवी आस
जीवावर बेतते तेव्हा
गळा येतो फास

शेतकरी मी माझा
तोट्याचाच धंदा
जगाचे भरे पोट
माझ्या भुकेचा वांधा

जरी पिकविले काही
हमी नाही भावाची
किंमत जाते कुठे
माझ्या कठीण श्रमाची

अनुदानाचा तुकडा
नका तोंडावर फेकू
पॅकेज ची फोलकटें
नका इथे तिथे टाकू

खुप असेल जिव्हाळा
माझ्याप्रति आर्त
जरा बनवा की थोड़ी
माझी शेती ही स्मार्ट

माझ्या शेतीलाही
तुम्ही कंपनी समजा
पाणी ही थोड़सं
तिच्याकडे वळवा

माझ्या शेतीमालाचा
हमीभाव ठरवू दया
मला ही थोड़सं माझं
जीवन जगू दया
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com