Author Topic: शोधतोय मी एक माणूस  (Read 644 times)

Offline Vinod Thorat

  • Newbie
  • *
  • Posts: 16
शोधतोय मी एक माणूस
« on: September 10, 2015, 09:07:05 PM »

शोधतोय मी एक माणूस


गजबजलेल्या या जगात
शोधतोय मी एक माणूस
माणसांसारखी दिसणारी
अनेक यंत्र फिरतायेत अवतीभवती
माणूसपण मात्र केव्हाच हरवलाय या यंत्रामधून


प्रत्येक यंत्रासोबत अनेक लेबल
चिकटलीयेत त्याच्या निर्मितीपासूनच
धर्माची, जातीची, वर्णाची, प्रेदेशाची
अन अशीच कितीतरी
पण मानवतेच लेबल सापडत नाही कुठेच


लिंकन, ल्युथर, गांधी
नावाच्या काही माणसांनी केलाही होता प्रयत्न
यंत्रांमधील माणूसपण जागविण्याचा
पण निर्ढावलेली यंत्र मात्र चालत राहिली स्वतःच्याच मार्गाने
अगदी त्याच्या प्रेतांवर पाय देऊन


फक्त स्वार्थ न लोभाची इंधन पिऊन
चाललात हि यंत्र अव्याहतपणे
इतर भावना जणू कधी अस्तित्वातच नव्हत्या
त्या सापडतात आता फक्त शब्दकोशातून


मानवतेचा मंत्र घेऊन
उभा राहिलाच कोणी दाभोलकर अथवा पानसरे
तर त्याचीही केली जाते हत्या दिवसाढवळ्या
अन चाललात गोळ्या मलालावरही
टाकायला त्यांचाहि आवाज चिरडून


बदलत चाललेला हा मानवतावाद
नामशेष करणार माणूस नावाचा प्राणी
अन माझा शोध अपूर्णच राहणार बहुदा
कारण माझ्यातलाही माणूस मी बसलोय कुठेतरी हरवून


-विनोद थोरात, जुन्नर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Vinod Thorat

  • Newbie
  • *
  • Posts: 16
Re: शोधतोय मी एक माणूस
« Reply #1 on: September 10, 2015, 09:31:09 PM »
कविता आवडल्यास कॉमेंट जरूर करा