Author Topic: भूक भागत नाही  (Read 438 times)

Offline abhishek panchal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
भूक भागत नाही
« on: September 14, 2015, 09:11:21 AM »
आनंदाच्या क्षणांना , लागते संकटांची नजर
दु:खाच्या अंधारात , हासु नसतेच हजर
दु:ख करते कहर , येतो अश्रुंचा पुर
अगदी समोरुन दिसते , सुख जाताना दुर
दाटते दु:खाचे धुके , पुढे रस्ता दिसत नाही
नेमके अशाच वेळी , काय करु सुचत नाही
सुख गेलय पळुन , त्याला शोधू तरी कसे
माझं नशिब किती वेड , खुळ माझ्यावरच हसे
माझी अशी स्थिती बघता , देव येतो मग धावून
माझ्याकडचं थोड दु:ख , संगे निघतो घेउन
एक त्यालाच ती चिंता , माझी दशा पहावत नाही
संकटात पडल्यावर मी , माझ्यावर हासत नाही
देतो पाठीवर थाप , पुढे लढण्यासाठी
देव येतो माझ्यासंगे , घेऊन कृपेची काठी
देऊन मायेचा आधार , दु:ख बाजुला तो करतो
माझ्याच या जन्मासाठी , पुन्हा पुन्हा तो का मरतो
मती माझीच ती खोटी , दोष देतो जो मी त्याला
त्याने जन्म दिला मोठा , सुख दिले अन वाट्याला
सारे देऊन मग मला , देव काही मागत नाही
सारंकाही घेउन , माझी भुक भागत नाही

Marathi Kavita : मराठी कविता