नशीब माझ असाच प्रत्येक वेळा मला रडवत.
आशा करते सुखाची,
दुख माझ्या वाट्याला येत.
कधी खूप मनापासून वाटत कुणीतरी साथ द्यावी.
दुखी मनाला सुखाची थोडी तरी आस द्यावी.
पण पुन्हा नशीब माझ माज्यापुढे येवून ठाकत.
"कुणी दिला तुला स्वप्न बघण्याचा अधिकार " ,
सारखा सारखा मला विचारत.
स्वप्न बघण्याचा अधिकार,
मला माझ्या नशिबाने दिला नाही.
कारण श्रीमंत आई-बापाच्या पोटी जन्म माझा झाला नाही.
श्रीमंती तर सोडाच साधे आई- बापाचे प्रेम हि मला मिळाल नाही.
कस स्वप्न सजवणार मी त्या राजकुमारच जेव्हा माझ नशीबच माझ्या सोबत नाही.
unknown