Author Topic: अश्रृ ही थिजले......  (Read 499 times)

Offline yogesh desale

  • Newbie
  • *
  • Posts: 15
अश्रृ ही थिजले......
« on: September 22, 2015, 11:13:25 AM »
      अश्रृ ही थिजले......

         - योगेश देसले

काय करु मज काही न सुचले,
वाटं पाहुनी अश्रृ ही थिजले ।

नभांगणीचे मोजुन तारे,
सारे दिस मागे सुटले ।

देखुन झाली सारी शोभा,
तरी तु न आली प्रभा ।

समयरागीणी धावतं सुटली,
तु येण्याची आस ही मिटली ।

विहीरीवरचे धौत आटले,
भेटावेसे तुज तरी न वाटले ?

मी पाकोळीसम धुंडीत राही,
तृशा तरी न मिटली काही ।

धरतीचे ते चाक ही फिरले,
उरले सुरले सारे सरले ।

आता तरी तु थेंबे बरसशीलं,
मरणाचा हा पाश तोडशीलं ।

ये होऊन तु वर्षाधारा,
तुझाच आहे मजं सहारा ।

न मागे मी सुवर्ण लंका,
आगमनाचा तुझ्या वाजुदे डंका ।

हातं जोडुनी विनवीतो तुजला,
देशास माझ्या तुझाचं हवाला ।

नको रागवु गं मृगराणी,
तुझीच गातो आम्ही गाणी ।

काय करु मजं काही न सुचले,
वाटं पाहुनी अश्रृ ही थिजले....
वाटं पाहुनी........
               - योगेश देसले

Marathi Kavita : मराठी कविता