Author Topic: गळालेल पान  (Read 562 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
गळालेल पान
« on: September 24, 2015, 08:33:43 AM »
जिवंत होण्या तळमळे, जळालेल रान रे
अस्तित्व शोधण्या फिरे, गळालेल पान रे !


वाऱ्या संगे गरगरे,आग बघून थरथरे
फिरे रानोरान, त्याचे कंठी आले प्राण रे
अस्तित्व शोधण्या फिरे, गळालेल पान रे !

ना रहिली अंगी हिम्मत, ना भेटी जगी किम्मत
घेऊन वाडवडीलांची आण, पार करी ते तूफ़ान रे
अस्तित्व शोधण्या फिरे, गळालेल पान रे !

डोंगर नदी दर्या, जरी जाळणारा तो सूर्या
त्यांचा तीक्ष्ण तो बाण, झेली हरवून दैभान रे
अस्तित्व शोधण्या फिरे, गळालेल पान रे !

संजय बनसोडे -9819444028

Marathi Kavita : मराठी कविता