Author Topic: मोची  (Read 400 times)

Offline vpnagarkar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
मोची
« on: September 25, 2015, 10:52:13 AM »
मोची ( कवि धूमिल )

हिंदी साहित्यातील सुप्रसिध्द कवि स्व. धूमिल ( सुधाकर पांडे) यांची सुप्रसिध्द कविता मोची या रचनेचा मराठी अनुवाद वाचकां पुढे सादर करीत आहे.
( मुळ नांव- सुदामा पांडेय, उपनाम धूमिल जन्म स्थानखेवली, जिला वाराणसी, उत्तरप्रदेशकुछ
प्रमुख रचना- संसद से सड़क तक (1972), कल सुनना मुझे, सुदामा पाण्डे का प्रजातंत्र (1983)विविध कल सुनना मुझे काव्य संग्रहा करीता 1979 साली साहित्य अकादमी पुरस्कार)


रापी चालवताना
त्‍याने माझ्याकडे क्षणभर वर खाली पाहिले
आणि दयनीय स्‍वरात
तो हसत  म्‍हणाला -
'बाबुजी, खर सांगू - माझ्या नजरेत
कोणी छोटा नाही
कोणी मोठा नाही
माझ्या दृष्‍टीने प्रत्‍येक माणूस एक जोडी चप्‍पल आहे.
जो माझ्या समोर
दुरुस्‍ती करीता उभा आहे.
आणि मुख्‍य गोष्‍ट म्‍हणजे
तो आपल्‍या जागी कोणीही असो.
जसा आहे, ज्‍या ठिकाणी आहे.
आजकाल,  कोणीही व्‍यक्‍ती चपलेच्‍या मापाबाहेर नाही.
तरी सुध्‍दा माझे लक्ष असते की
व्‍यावसायिक हात व फाटलेल्‍या चपलेच्‍या मध्‍ये
कोठे ना कोठे एक साधारण माणुस आहे
ज्‍याच्‍यावर टाके पडतात
जो चपलेच्‍या बाहेर डोकावणा-या अंगठयाची जखम
छातीवर घाव सोसत सहन करतो.
येथे  नानाविध चपला येतात
आणि माणसाला निरनिराळया आपआपल्या  पसंती दाखवतात.
सर्वांचा आप आपला चेहरा आहे.
आपआपली शैली आहे.
उदाहरणार्थ-  एक चप्‍पल आहे
चप्‍पल काय ती एक ठिगळांची थैली आहे
जिला एक चेहरा वापरतो
जो देवीच्‍या व्रणाने भरलेला आहे.
विश्‍वास दर्शक हसण्‍यामध्‍ये
टेलिफोन खांबावर अडकलेली पतंग आहे.
जी फडफड आवाज करीत आहे
बाबुजी या चपलेवर पैसे व्‍यर्थ का उधळता,
मी हे बोलु इच्छितो परंतु
माझ्या आतुन एक आवाज येतो-
काय माण्‍ुस आहे. आपल्‍या जातीवर थुंकतो आहेस,
तुम्‍ही विश्‍वास ठेवा त्‍या क्षणी मी
ठिगळाप्रमाणे मी डोळे शिवुन घेतो
आणि संकटात पडलेल्‍या माणसाची
मोठ्या मुश्‍कीलीने सुटका करतो,
एक चप्‍पल अशी आहे
जी गुंफून एक माणुस निघतो सफरीवर ,
तो हुशार नाही  वेळेचा ताबेदार नाही
त्‍याच्‍या डोळ्यात लालच भरलेली आहे
हातात त्‍याच्‍या घड्याळ आहे
त्‍याला कोठे जायचे नाही परंतु
चेह-यावर त्‍याच्‍या गडबड आहे
तो कोणी व्‍यापारी आहे किंवा दलाल
परंतु उध्‍दट असा कि हिटलरचा नातु आहे
इथे बांध,तिथे काप, इथे ठोक तिथे पिट
चांगले घास,असे चमकवं, चपलेचा आरसा बनवं
ओफ्फ किती उकाडा आहे!
रुमालाने हवा घेत तो हवामानावर संतापतो
सडकेवर येणा-या जाणा-यावर
वानराप्रमाणे टवकारुन पाहतो
यावर कडी म्‍हणजे  घंटाभर काम करुन
मजुरी देताना साफ नाटक करतो
सज्‍जन लोकांना लुटता का ? असे डाफरत तो
काही नाणी फिरकावतो व
पुढे निघून जातो.
अचानक दचकत तो सडकेवर धावतो
आणि मार्गस्‍थ होतो.
व्‍यवसायावर जेव्‍हा घाव पडतो
तेव्‍हा कोठेतरी एक चोर  खिळा
दबा धरुन वेळ मिळताच
अंगठ्यात रुततो.
याचा अर्थ असा नाही की माझा
गैरसमज झालेला आहे.
प्रत्‍येक क्षणी मला असे वाटते की
चप्‍पल व व्‍यवसायाच्‍या दरम्‍यान
कोठेतरी एक साधारण माणुस असतो
ज्‍याच्‍यावर टाके पडतात
जो चपलेच्‍या बाहेर डोकावणा-या बोटाची जखम
छातीवर हातोड्याचे घाव सोसत सहन करतो,
आणि बाबुजी, खरे सत्‍य हेच आहे की
जिवंत राहण्‍यासाठी खरा तर्क नसेल तर
रामनाम विकून या वेश्‍यांची दलाली करुन
रोजीरोटी कमावण्‍यात काहीच फरक नाही
आणि हेच ते ठिकाण आहे जिथे
प्रत्‍येक माणुस आपला धंदा सोडून
गर्दीत उजळणारा हिस्‍सा बनतो
सगळ्या लोकाप्रमाणे
भाषा त्‍याला चावते
मौसम सतावतात
आता तुम्‍ही त्‍या वसंताकडे पहा.-
हा दिवसा धाग्‍याप्रमाणे ताणतो
झाडावरील लाल लाल हजारो पानांच्‍या टोकाला
उन्‍हात शिजवण्‍यासाठी लटकावतो,
खरे सांगतो त्‍या समयी
रापीची मुठ हातात सांभाळणे
फार मुश्‍कील बनते
डोळे कोठे जातात तर हात कोठे तरी चालतो
मन त्रासलेल्‍या बालकाप्रमाणे
कामावर परतण्‍यास इंकार करते
वाटते की चमड्याच्‍या सज्‍जनतेमागे
एखादे जंगल आहे  जो माणसावर
झाडामागून वार करतो
आणि हे धक्‍कादायक नव्‍हे तर विचार
करण्‍या योग्‍य गोष्‍ट आहे,
परंतु जो जीवनाला पुस्‍तकांनी मापतो
जो सत्‍य आणि अनुभवाच्‍या दरम्‍यान
हत्‍येच्‍या क्षणी डरपोक आहे
तो मोठ्या सहजपणे म्‍हणू शकतो
यार तु मोची नव्‍हे तर शायर आहेस
जो विचार करतो की आग
सर्वांना जाळते, सत्‍य सर्वांच्‍या पलीकडे आहे
काही आहेत ज्‍यांना शब्‍द गवसले आहेत.
काही आहेत जे अक्षरांसमोर आंधळे आहेत
ते प्रत्‍येक अन्‍याय चुपचाप सहन करतात
आणि पोटाच्‍या आगीसमोर डरपोक बनतात.
जेव्‍हा मी हे जाणतो की-
"नकाराने व्‍याप्‍त एक आरोळी "
आणि "एक समजुतदार मौन"
दोघांचा मतलब एक आहे
भविष्‍य घडवण्‍यासाठी 'मौन' व 'आरोळी'
आप आपल्‍या जागी एक प्रकारे
आप आपले कर्तव्‍य बजावीत असतात.

Marathi Kavita : मराठी कविता

मोची
« on: September 25, 2015, 10:52:13 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):