Author Topic: दुःख  (Read 650 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
दुःख
« on: October 17, 2015, 04:16:09 PM »
जेव्हा माझ्या हृदयाचा  आवाज
मला कर्कश वाटतो
माझाच  श्वास मला
विषारी दंश करतो

जेव्हा माझ्याच शरीराचे वजन
मला ठरतात भार
अन् माझेच शस्त्र
माझ्यावर करतात वार

जेव्हा माझाच  विश्वास
माझा करतो विश्वासघात,
माझेच मन माझ्यावर
करू  पाहते मात

जेव्हा माझाच हात
माझ्या खुनाचा करतात प्रयत्न
अन् नरकात ढकलण्याचा
माझ्या पायाचा असतो यत्न

तेव्हा फक्त तेव्हाच
जगण्यापेक्षा मृत्यू बरा वाटतो
शरीरातील सर्व प्राण
कंठाशी दाटून येतो

Marathi Kavita : मराठी कविता