Author Topic: खरा समाज  (Read 484 times)

खरा समाज
« on: October 27, 2015, 10:32:23 PM »
होतेय इथे मुस्कटदाबी
प्रत्तेक आवाजाची...
यातनांची, वेदनेंची, किंचाळयांची...
डांबला जातोय उठनारा हर एक आवाज..
लोकशाहीच्या कैद्खान्यात..
कापला जातोय चर-चर
जातीयतेच्या कत्तलखान्यात...
मागतोय प्रत्तेक गरीब न्यायाची भिक...
दिला जातोय त्याच्या हातात डोळ्यावर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेचा फोटो...
आंधळेपणाचं सोंग घेउन...
जी लाखो अनाथांची, बिनदोषांच्या शिव्या-श्राप खातेय...
मागून न्याय मिळत नाही...
मी वेगळ सांगायला नको...
सुजाण लोक...
झिजवणार नाही कोर्ट- कचे-यांच्या शिड्या...
त्यासाठी...
बनवावा लागेल नवीन रस्ता...
जुन्या रस्त्यांना वाळीत टाकून..
घालावा लागेल क्रांतीकारकांचा पोशाक...
एक संघ होउनिया गाडावे लागतील...
बेफिकीर होउन सैतान्यांचे मुडदे..
छाटाव्या लागतील अनेक विषारी फांद्या..
तोडावे लागतील अन्यायात बंद करणारी कुंपणे...
त्यासाठी आठवावा लागेल तो शिवबा-फुले-आंबेडकर..
वाचावा लागेल..खरा समजावा लागेल..
जेव्हा पेटेल..उठेल..आणि मगच दिसेल..
मोठा क्रांतिकारी समाज..
खरा जीवंत समाज...
-प्रसाद देठे.(विद्रोही प्रेमवीर)

Marathi Kavita : मराठी कविता