इकडे तिकडे न पहाता
आम्ही रस्ता ओलांडणार,
बेदरकार गाडी चालक
कुणी आम्हाला येवून धडकवणार,,
चार-आठ दिवस पलंगावर पडून
दवाखान्याचे बिल वाढवणार,,,
वाहतुकीचे नियम माहिती आहेत
तरी आम्ही सिग्नल तोडणार,
घरदार नाही म्हणुन
आम्ही फुटपाथवरच झोपणार,,
नशेबाज श्रीमंताचं पोरं एखादं
गाडीने आम्हाला चिरडत जाणार,,,
असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार..|
रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार..||
आता उन होते म्हणत
धो-धो पाउस कोसळणार,
थोडया-थोडक्या पवासनेही
गटारी, नाले तुडुम्ब भरणार,,
रस्ते, गल्लीबोळातुन
घराघरातून पाणी शिरणार,,,
मुलभूत सुविधांअभावी
अनेक जीव पाण्यात जाणार,
जीव तोडून कशीबशी
मदतीसाठी हाक मारणार,,
प्रशासनाला शिव्या देत
दोन दिवसांनी घरी पोहचणार,,,
असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार..|
रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार..||
प्रांतिक अन भाषिक वाद
इथे रोजच चालणार,
हाणामा-या, बंद
जाळपोळ अन दगडफेक
मराठी- अमराठींना
अमराठी- मराठींना मारणार,,,
गर्दीतून येणारा एक दगड
कुणाचंही डोकं फोडणार,
कुणी एक नेता
जमावाला आपल्या जाळ्यात ओढणार,,
त्यातच कुणी एक आपलं
धार्मिकतेचं पिल्लू हळूच सोडणार,,,
असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार..|
रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार..||
सरे देशच जणू
मुंबईचे शत्रु,
अमेरिकन नागरिकही
इथे घरात बसून कट करणार,,
हा इथे आला कसा..?
पोलीस शोधात वेळ घालवणार,,,
रस्ते बंद करूनही
अतिरेकी समुद्रीमार्गे येणार,
लोकल, हॉटेल, दवाखाने
यांना बॉम्बचे लक्ष्य बनवणार,,
आमचा आपला एकच प्रश्न,
आम्ही अजुन किती सहन करणार..?
असल्या या मुंबईत, जिवाचे हाल किती सोसणार..|
रोजचं रूटीन असंच आमचं, आम्ही नाही सोडणार..||
-----------------------मनोज-------
09822543410