ठिगळ लावतोय आभाळाला
माझं आभाळच फाटलयं
डोळ्यांमधलं पाणी माझ्या
फार अगोदरच आटलयं
तरीही रडगाणे ते नेहमीचं
झिजलेलं आजकाल मी गात नाही
श्वास थांबतायत धावायचे हळुहळु
तरी मन मात्र थांबत नाही
अपेक्षा भंगाचं ओझं
आता माझ्याने पेलवत नाही
पावसात चालतो नेहमीच आवडीने
कारण मी रडतोय हे कधीच कुणाला कळत नाही
माझं प्रेत बघुन उद्या
तुम्ही नाकाला रुमाल लावाल
चांगला माणुस होता बिचारा
म्हणुन दोन अश्रु ढाळाल
सरणावर एकदा गेलो मी
की माझ्या आठवणे देखील सरतील
मी गेल्यावर माझ्यापाठी कोण
कशाला माझी आठवण देखील काढतील?
उद्या त्या खोट्या अश्रुंचे
व्याज माझ्या डोक्यावर नको
निदान वर गेल्यावर् तरी मला
काही द्यायचे बाकी राहील्याची चिंता नको
उगाच माझी कोणाला काळजी नको
अन माझ्यामुळे तुम्हाला त्रासही नको
ही कवीता वाचुन कदाचीत
तुम्हीदेखील चुकचुकाल
काहीतरी वेड्यासारखं लिहीलय ह्याने
असेच काहीसे पुटपुटाल
पण ह्यातही जगण्याची एक निराळी अदा आहे
मरतामरता जगण्याची एक बेगळीच नशा आहे
जगलो तर जगुद्या
मेलोच तर मरुद्या
आभाळ शिवुन झालंय माझं
त्यात निदान पाणी तरी साठु द्या
ह्या जगातुन जायच्या आधी
मला एकदा मनसोक्त रडायचयं
अन त्यासाठी कदाचीत मला
अगदी चिंब होउन भिजायचयं
नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)