माझे शब्द, माझ्या कवीता,
माझा चेहरा, माझी ओळख,
दिवसेंदिवस धुसर अन अस्पष्ठ...
आहेत त्या जुन्या आठवणी
त्या जुन्या वहीची पाने...
त्यात ठेवलेले एक "मोरपीस"
एक "गुलाब" आणी एक "जाळीचं पिंपळपान"
वाटतं फेकुन द्यावं सारं...
का? कोणासाठी? अजुन कितीवेळ?
कवी .... कवीता... का?
"प्रेमकवीता"... "विरहकवीता"...
अजुन काय काय लिहायचे ?
एखाद अप्रतीम काव्य लिहीले?
का अजुन शब्दच सापडले नाहीत?
काय मिळालं काय गमावलं ह्याचा मांडलेला "हिशोब"..
का गुंतलेय मन अजुन त्या जिर्ण पानांत?
का दाटतेय पाणी पुन्हा पुन्हा डोळ्यांत?
कसला हा बंध? बंध का बंधन?
सारं कसं अकल्पीत अनाहुत,
अन जगण्याचं हरवलेलं ध्येय...
का?
नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)