माउली ग माउली,
मी गं तुझी बाहुली,
तुझ्या घरची मी साउली,
दोन दिवसांची मी पाहुणी.
तुम्हाला त्रास देऊन,
जाईन मी एकदा निघून.
जाताना तुम्हा सोडून,
सासरी बसेन गं मी रुसून.
तुझ्यापाशी आता हट्ट
धरायला मी राहणार नाही,
तुझं न ऐकणारं,
असं कुणी आता तुला मिळणार नाही.
दादाला भांडायला आता
कुणी भेटणार नाही,
पप्पांना लाड करायला
आता कुणी पुरणार नाही.
आजीला आता रागवायची
वेळ येणार नाही,
अन आजोबांना
अभ्यास करताना कुणी दिसणार नाही.
जायचा आधी माझ्यासाठी एकदा अंगाई गाशील ना?
तुझ्यापाशी, तुझ्या मांडीवर शेवटचं झोपू देशील ना?
लहानपणीचा तो गोडगोड पापा मला देशील ना?
छोटे खेळ भांडे सारखे आता मोठे खेळ भांडे पाहायला
माझ्या सासरी येशील ना?
माउली गं माउली,
का गं माझी अशी कहाणी?
तुझी पण अशीच होती का गं रहाणी?
जगाची अशीच असते का गं मुलीवर पाहणी?
माउली गं माउली,
मी गं तुझी बाहुली.
तुझ्या घरची मी साउली,
दोन दिवसांची मी पाहुणी.
वैशाली ......................