का स्वप्नाना शोधायचं
मुठितुन सरकतात वाळूसारखे ...
एक एक कण कण ...
जमा करायचा कसा ..
स्वप्नान्विना जगायला मजा येत नाही
हे जरी खर असल कि...
स्वपन्नाच्या मनोऱ्यावर चढायला ...
पायात त्राण नाही रे माझ्या,
तुझी सोबत होती तेव्हा बर होत ....
मनोरा तू दाखवायचास ...
मी दुजोरा द्यायची ...
आता मी एकटीच जगते...स्वप्नान्विना
जगायच म्हणुन जगते ..मरण येतच नाही
प्राक्तनाचा भोग
भोगयाचाच असतो ..
जीवनाची कविता वाचू कशाला ...
एक दिवस मी संपणारच तर आहे...
कल्पी जोशी ३१/०१/2009