[/b]
मला जायलाच हवंतुला जायचं होतं तू गेलीस
मी देखिल जाईल,
एक दिवस ,माझा श्वास थाम्बल्यावर
नाहीतरी तुझ्याविना .....
काय तग धरणार तो ..
पुन्हा विचारायचं नाहीस ,
मला नं विचारता ...
का गेलास ,
भकास चेहरे , आणि उष्ण वारे
उरतील मग माझ्या नंतर
कोरड्या विहिरी , सुकलेली वृक्ष वेली
आठवण देतील तुला माझ्या विना
जीवनाची ...
जीवनातल्या प्रतेक क्षणी तुला ..
माझी सोबत हवी होती ........
पण शक्य नाही ते .
रूतुचक्राचा मान मला ठेवावाच लागेल ..
मला जायलाच पाहिजे..
कल्पी जोशी २५/०१/2009