ते मार्ग तसेच होते ,पण हवे तेच नव्हते,
प्राक्तनात गवसले जे काही, ते भलतेच होते.
ओंजळ होती भरलेली ऐश्वर्याने तुडुंब,
पण मनातले हात तर, खरे रितेच होते.
मुक्काम गाठला आज, ज्याची वाट धरली होती,
आलोच का या मार्गा? हे मनातले पेच होते.
वाहवा झाली माझ्या कीर्तीची चहूकडे,
मी चुकलो होतो वाट ,हे कळले नुकतेच होते.
विस्कटली होती वाट ती, अन वळणेही पुसट होती,
इथवर आली ती परिस्थिती, ईच्छा घुटमळत तिथेच होती.
स्वमर्जी झुगारून मी सोडले हमरस्ते,धरले वळण होते,
त्या वळणावर झालेले घाव, आजही तसेच होते.
पाठीवरल्या चाबकाने विसरवले वेड मनाचे,
त्यांना वाटते कि ठीक सारे! म्हणून ते मजेत होते.
... अमोल
[/size]